आदिवासी परंपरेचा गौरव! आमदार अनिल दादा पाटील यांना ‘विडा’ व ‘कुऱ्हाड’ भेट देऊन सन्मानित..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आदरणीय अनिल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी क्रांती दल शाखा, अमळनेर तर्फे एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

या खास प्रसंगी दादांना आदिवासी परंपरेचे प्रतीक असलेले विडा आणि कुऱ्हाड ही परंपरागत हत्यारे भेट देण्यात आली.
🔹 विडा – निष्ठा, नाते आणि आदराचे प्रतीक
🔹 कुऱ्हाड – लढा, स्वाभिमान व अस्तित्वाचे रक्षण यांचे प्रतीक
हा सन्मान केवळ वाढदिवसाचा नसून, आदिवासी समाजासाठी अनिल दादांनी दिलेल्या योगदानाचा व नेतृत्वगुणांचा गौरव मानून देण्यात आला.
संघटनेतर्फे यावेळी तालुकाध्यक्ष आप्पा दाभाडे, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बैसाणे, तात्या भाऊ वैदू, गोरख बाबा साळुंखे, दयाराम मोरे, रामदास ढालवाले, प्रकाश मोरे भिल, रतिलाल पारधी (सोनवणे), अर्जुन भिल, धुलसिंग दादा भिल, किरण भाऊ सोनवणे, दादु बाळू, कु. निशा दाभाडे, रवी वैदू, नत्थू वैदू यांच्यासह मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते.
“आदिवासींच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाला आमचा सलाम!”
“परंपरा आणि प्रगती यांचा सेतू ठरणाऱ्या आमदार दादांना आदिवासी क्रांती दलाचा नतमस्तक सन्मान!”