“आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव – सामाजिक उपक्रमांची रेलचेल”

आबिद शेख/ अमळनेर
– महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व अमळनेर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला राज्यभरातून मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली होती. परिसर यात्रेसारखा गजबजलेला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ना. गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदींसह अनेक मंत्री, आमदार, नेते आणि विविध पक्षांचे मान्यवरांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतूनही अनेक मान्यवर भेटीसाठी आले होते.
शुभेच्छांसोबतच दिवसभर विविध समाजोपयोगी उपक्रमांनी सोहळा संस्मरणीय ठरला. काही महत्त्वाचे उपक्रम खालीलप्रमाणे:

अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ आणि माजी जि.प. सदस्य सौ. जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. या उपक्रमाचे दोन्ही मान्यवरांनी कौतुक केले असून, या रुग्णवाहिकेचा तालुक्यातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.
वही-शैक्षणिक साहित्याची ‘तुला’

गुंजाळ झेरॉक्स (तहसील कार्यालयासमोर) येथे १५०० वह्यांची ‘तुला’ करण्यात आली. त्या वह्यांचे लवकरच गरजू विद्यार्थ्यांमध्ये वाटप होणार आहे. प्रसन्ना जैन, गजु गुंजाळ, सतीश पारख, सुनील जैन यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
रक्तदान शिबिर – १३८ रक्तपिशव्या संकलित

धुळे, अमळनेर व जळगाव येथील रक्तपेढ्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात १३८ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. याशिवाय अपंगांना व्हीलचेअर व कर्णयंत्रे देण्यात आली.
सहा नव्या टॅक्सींचे उद्घाटन

काली पिली टॅक्सी युनियनतर्फे सहा नव्या मारुती इको टॅक्सीचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. टॅक्सी चालक-वाहकांनी आमदारांना केक कापून शुभेच्छा दिल्या व अजूनही नवीन टॅक्सी लवकरच दाखल होतील असा विश्वास व्यक्त केला.
राजकीय प्रवेश आणि इतर उपक्रम
वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक इतर पक्षातील मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहर व ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. संपूर्ण शहरात कार्यकर्त्यांकडून भव्य बॅनर्स व कमानी लावण्यात आल्याने सोहळ्याची चर्चा सर्वत्र होती.
समारोप:
आमदार अनिल पाटलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेले हे सामाजिक उपक्रम लोकाभिमुख कार्याची साक्ष देतात. शुभेच्छांचा वर्षाव आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण अमळनेर तालुक्यात उत्सवाचे आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89500/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1090/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट