आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर बाजार समितीत बैलसाज व शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन..

आबिद शेख/अमळनेर

मा. मंत्री आ. अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आज सोमवार, दि. ७ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष दिनाचे औचित्य साधून, तालुक्यातील बैलजोडी असणाऱ्या शेतकरी सभासदांना पोळा सणासाठी बैलांचा साज वाटप कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ मा. मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून, त्यांच्या हस्ते बैल साजाचे वितरण केले जाईल.
याच कार्यक्रमात अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “शैक्षणिक साहित्य तुला” देखील करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जमा झालेले शैक्षणिक साहित्य तालुक्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल.
तसेच, बाजार समितीतील मापाडी कामगारांसाठी वैयक्तिक लॉकरची सुविधा सुरू करण्यात येत असून, कामगारांना त्यांच्या लॉकरच्या किल्ल्यांचे वाटप अनिल पाटील यांच्या हस्ते होईल.
या कार्यक्रमासाठी शेतकरी सभासद, नागरिक आणि अनिल पाटील यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील आणि संचालक मंडळाने केले आहे.