मोहरमच्या मातम मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी – राष्ट्रवादी काँग्रेसचे आरिफ भाया यांच्या हस्ते इराणी समाजाचा सत्कार..


आबिद शेख/अमळनेर
मोहरमच्या निमित्ताने अमळनेर शहरात इराणी मुस्लिम बांधवांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने मातम मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण ठेवत भाविकांनी मातम करत श्रद्धांजली अर्पण केली.

मातम पथकांसह मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत होती. धार्मिक भावनांनी भारलेल्या या मिरवणुकीत सर्वत्र श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळाले.
शहरातील सुभाष चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आरिफ भाया यांच्या पुढाकाराने इराणी समाजाचे अध्यक्ष अख्तर अली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निकम साहेब यांची विशेष उपस्थिती होती.
