मोहर्रमच्या निमित्ताने ए.पी.जे. अब्दुल कलाम विचार मंचतर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळांचे वाटप..

24 प्राईम न्यूज 7 Jul 2025


आज दि. ६ जुलै २०२५, रविवार, १० मोहर्रम रोजी हजरत इमाम हुसैन (र.अ.) यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ ए. पी. जे. अब्दुल कलाम विचार मंच, धरनगाव यांच्या वतीने धरनगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाच्या वेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये धरनगाव शहर मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी इरफान हाजी अरमान शेख, धरनगाव मुस्लिम कब्रस्तान अध्यक्ष हाजी हफीज़ोद्दीन मोमिन, ए. पी. जे. अब्दुल कलाम विचार मंच अध्यक्ष करीम खान, उपाध्यक्ष रहेमान शाह, सचिव शफी शाह, सहसचिव नदीम काझी आणि सदस्य निजामोद्दीन सर बेलदार यांचा समावेश होता.
या उपक्रमातून सामाजिक ऐक्याचा संदेश देत, इमामे हुसैन यांच्या बलिदानाची आठवण भावपूर्ण पद्धतीने जागवण्यात आली.