अमळनेर नगरपरिषदेकडून स्वच्छतेसंदर्भातील तक्रारीसाठी विशेष मोबाईल क्रमांक जाहीर. – नागरिकांचा सुसंवाद साधण्यासाठी विधायक पाऊल!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – शहरातील स्वच्छता व्यवस्थेस अधिक कार्यक्षम व उत्तरदायी बनविण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेतर्फे घंटागाडी सेवा, कचरा संकलन व इतर स्वच्छतासंबंधित तक्रारींसाठी प्रभागनिहाय तक्रार निवारण मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. या उपक्रमातून नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडविणे व संवाद वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.

नगरपरिषद स्वच्छता विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, तक्रारी करताना खालील प्रमाणे आपले नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, तक्रारीचे स्वरूप व ठिकाण या सर्व माहितीचा समावेश करून, आपापल्या प्रभागातील संबंधित सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधावा. तक्रार करताना अत्यंत साधी, स्पष्ट व सन्मानजनक भाषा वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभागनिहाय संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :
🔹 प्रभाग क्र. ०१ ते ०७ – कृष्णा पाटील–. 8999551933
🔹 प्रभाग क्र. ०८ ते १२ – बाबासाहेब पाटील. –. 8459067366
🔹 प्रभाग क्र. १३ ते १७ – राजेंद्र गोलाईत. – 9764176262
या उपक्रमातून नगरपरिषदेच्या सेवांचे व्यवस्थापन सुधारून, नागरिक व प्रशासन यांच्यातील अंतर कमी करून, एक सुसंवादाचे बळकट दुवे निर्माण करण्याचा हेतू आहे. नगरपरिषद नागरिकांच्या तक्रारींचे निवारण सकारात्मक दृष्टिकोनातून करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले आपली तक्रार वेळेत, योग्य पद्धतीने व सुसंवादाच्या माध्यमातून नोंदवा आणि शहराच्या स्वच्छतेत सक्रीय सहभाग नोंदवा!
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट