“अमळनेर अर्बन बँकेकडून आरोग्याचा महाउत्सव – शतकोत्सव निमित्त मोफत तपासण्या आणि मोठा प्रतिसाद!”

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून भव्य समग्र आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमळनेर अर्बन बँक, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय व लायन्स क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात ३५०० रुपयांपर्यंतच्या ५० पेक्षा अधिक चाचण्या पूर्णपणे मोफत करून देण्यात आल्या. यामध्ये थायरॉईड प्रोफाइल, किडनी प्रोफाइल, HbA1c, लिव्हर फंक्शन, सीबीसी, लिपिड प्रोफाइल, आयर्न स्टडीज अशा महत्त्वाच्या चाचण्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सहाय्यक निबंधक कुणाल सोनार, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना डॉ. संदीप जोशी यांनी “समग्र आरोग्य तपासणी ही काळाची गरज आहे”, असे मत व्यक्त केले, तर चेअरमन पंकज मुंदडे यांनी “बँक सामाजिक बांधिलकी जपत लोकोपयोगी उपक्रम करत आहे”, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले. शिबिरात सभासद, ठेवीदार, कर्जदार, पिग्मी एजंट, महिला, ज्येष्ठ नागरिक, बँकेचे कर्मचारी, हितचिंतक व लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुंबई येथील जनरल डायग्नोस्टिक लॅबोरेटरी व माऊली मेडिकल फाउंडेशनच्या पॅथॉलॉजिकल टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराची सुरुवात ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रतिनिधींनी तपासणी करून करण्यात आली.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, त्यामध्ये –
डॉ. मनीषा लाठी, विजय बोरसे, नितीन विंचूरकर, डॉ. रवींद्र कुलकर्णी, योगेश मुंदडे, विनोद अग्रवाल, अमृत पाटील, डॉ. मिलिंद नवसारीकर, पांडुरंग महाजन, मुन्ना शर्मा, जितेंद्र झाबक, भोजमल पाटील, डॉ. मयुरी जोशी, ॲड. किशोर बागुल, ॲड. राजेंद्र चौधरी, दिलीप गांधी, सुभाषचंद्र सोमाणी, प्रशांत सिंघवी यांच्यासह अनेक समाजप्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन पंकज मुंदडे, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, संचालक मंडळ – मोहन सातपुते, पंडित चौधरी, प्रविण जैन, भरत ललवाणी, अभिषेक पाटील, ॲड. व्ही. आर. पाटील, तसेच सहाय्यक निबंधक कार्यालय व बँकेचे कर्मचारी, एजंट्स यांचे विशेष योगदान लाभले.
शेवटी लायन्स सेक्रेटरी महेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1090/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट