सरपंच आरक्षण वाटपाची प्रक्रिया नगर परिषद सभागृहात होणार; महिलांसाठीही स्वतंत्र सोडत..

0


अमळनेर /आबिद शेख
मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार आणि ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडून १३ जून २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, ५ मार्च २०२५ रोजीची अधिसूचना अधिक्रमित करण्यात आली आहे. या नव्या अधिसूचनेनुसार, जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळता उर्वरित सर्व ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

मॉन्सून धमाका
रवि ज्वेलर्स सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजूरी

50%
मजुरीत सूट
22 कॅरेट 916 हॉलमार्क दागिने खरेदीवर
हमखास भेटवस्तू

त्यामुळे, तहसिलदार अमळनेर यांच्या कार्यालयाकडून ११ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेले तालुकानिहाय आरक्षणाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांना या कार्यासाठी अधिकृत केले आहे.

आरक्षण सोडतीसाठी सभा: या पार्श्वभूमीवर, ८ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता नगर परिषद सभागृह, अमळनेर येथे तालुक्यातील विविध प्रवर्गांतील (SC, ST, OBC, सर्वसाधारण) सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.

महिला आरक्षणासाठी स्वतंत्र सभा: या आरक्षणातून महिलांसाठी राखीव असलेली पदे निश्चित करण्यासाठी त्याच दिवशी दुपारी ४ वाजता दुसरी सभा घेण्यात येणार असून, तिचे अध्यक्षस्थान मा. उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्याकडे असणार आहे.

उपस्थित राहण्याचे आवाहन: अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी या दोन्ही सभांना उपस्थित राहून आरक्षण प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराना यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!