दिलीप जैन यांनी घेतला शिक्षण क्षेत्रातील दिग्गज लल्लन तिवारी यांचा आशीर्वाद..

24 प्राईम न्यूज 4 Jul 2025

भाजपच्या मीरा-भायंदर जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीनंतर दिलीप जैन यांनी गुरुवारी राहुल एज्युकेशन संस्थेचे चेअरमन लल्लन तिवारी यांची नवघर रोड येथील कार्यालयात भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
या प्रसंगी दिलीप जैन म्हणाले, “तिवारी सर हे मीरा-भायंदरचे भूषण आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ घेणे ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे.”
या भेटीप्रसंगी युवा भाजपा नेते ॲड. राजकुमार मिश्रा, भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते शैलेश पांडे, माजी मंडल अध्यक्ष रथीन दत्ता आणि नवघर मंडल अध्यक्ष संतोष गुप्ता उपस्थित होते.