अलीम मुजावर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका अध्यक्षपदी निवड – सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव!
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील अलीम मुजावर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून विविध मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या निवडीबद्दल माजी मंत्री आणि अमळनेरचे लोकप्रिय आमदार दादासाहेब अनिलभाईदास पाटील, माजी नगराध्यक्ष ताईसो जयश्री अनिल पाटील, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, कार्याध्यक्ष विनोद कदम सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, शरद दादा सोनवाने, जुनेद शेख, प्रवीण पाटील उर्फ बटू पाटील, महारू अण्णा, संचालक सचिन दादा पाटील, धारचे माजी सरपंच गणेश पाटील, अनिल शिशोदे, उमाकांत भाऊसाहेब, सुरेश पाटील, ईश्वंत बापू, सत्तार मास्टर, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, वी.एन. मुजावर, बाबू पेंटर, हाजी नईम, मुन्ना मुजावर, शाहरुख शेख, शौकत सैय्यद, नईम पठाण आदींनी शुभेच्छा देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अलीम मुजावर यांनीही या विश्वासाबद्दल पक्षश्रेष्ठींप्रती आभार व्यक्त करत सामाजिक, राजकीय आणि अल्पसंख्यांक हितासाठी निष्ठेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.