अलीम मुजावर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका अध्यक्षपदी नियुक्ती – सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील धार येथील समाजसेवक अलीम मुजावर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नेमणुकीनंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निवडीबाबत माजी मंत्री व आमदार दादासाहेब अनिलभाईदास पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्रीताई अनिल पाटील, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, कार्याध्यक्ष विनोद कदम, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, तसेच शरद दादा सोनवाने, जुनेद शेख, बटू पाटील, महारू अण्णा, सचिन दादा पाटील, गणेश पाटील, अनिल शिशोदे, उमाकांत भाऊसाहेब, सुरेश पाटील, ईश्वंत बापू, सत्तार मास्टर, मुख्तार खाटीक, वी.एन. मुजावर, बाबू पेंटर, हाजी नईम, मुन्ना मुजावर, शाहरुख शेख, शौकत सैय्यद, नईम पठाण आदी मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
या विश्वासाबद्दल अलीम मुजावर यांनी पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, तसेच मा.ना. अनिलदादा पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांचे आभार मानले.
मुजावर यांनी सांगितले की, “पक्षाच्या उद्दिष्टांनुसार संघटना बळकट करणे, अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आणि सामाजिक कार्यातून पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय असेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी मी निष्ठेने कार्य करीन.”