ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या दोन गणेश. मंडळांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील माळीवाड्यातील त्रिमूर्ती गणेश मंडळ आणि भोईवाड्यातील पवनपुत्र गणेश मंडळ या दोन्ही गणेश मंडळांनी अनंत चतुर्दशी च्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक ७ वाजेला जागेवरून हलवून रात्री ११ वाजेपर्यंत विसर्जन करण्याची परवानगी घेतली होती.
मात्र दोन्ही मंडळांनी रात्री ११ वाजता जावेवरून गणपती हलवून कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत अडथळे आणून सकाळी साडे पाच वाजेपर्यंत मिरवणूक विसर्जन केले. म्हणून गोपनीय पोलिस सिद्धांत शिसोदे यांनी पवनपुत्र गणेश मंडळाचे अध्यक्ष सुदाम जगन्नाथ शिंगाणे, राकेश रतीलाल शिंगाणे, दिनेश संतोष शिंगाणे, जितेंद्र बाळू शिंगाणे, विशाल संजय शिंगाणे, त्रिमूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ओंकार महाजन, त्रिमूर्ती मंडळाचे इतर सदस्य आणि काही इतर लोक अशाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३,४९, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज तपास करीत