निस्वार्थ श्रमांमुळे अमळनेरचा श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : श्री मंगळ जन्मोत्सव उत्सव हा फक्त भक्तीरसात न्हालेला सोहळा नव्हता, तर हजारो सेवेकऱ्यांच्या निस्वार्थ परिश्रमांचा अद्वितीय अनुभव ठरला. तब्बल एक लाखांहून अधिक भाविकांनी समाधानाने दर्शन घेतले.
या यशामागे श्री मंगळग्रह संस्थानचे पदाधिकारी, सेवेकरी, नगर पालिका प्रशासन, पोलिस पाटील संघटना, विविध महिला मंडळ, पोलिस प्रशासन, पत्रकार, रोटरी-लायन्स क्लब तसेच अनिरुद्धाय अकॅडमीसह असंख्य संघटनांचे अथक श्रम होते.
वाहतूक नियंत्रण, सुरक्षा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, भोजन, स्वच्छता आणि दर्शन व्यवस्था या सर्वच बाबतीत सर्वांनी आपला वेळ, श्रम आणि सामर्थ्य अर्पण केले. परिणामी हा सोहळा न भूतो न भविष्यति अशा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 110800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 101900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 84200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1290/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट