शिक्षक दिनानिमित्त PTA क्लासेस संघटनेचा भव्य वृक्षारोपण उपक्रम..

0

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर | रविवार, ७ सप्टेंबर २०२५ शिक्षक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात “माझा क्लास, माझे झाड” या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणपूरक वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA) तर्फे आयोजित या उपक्रमात राज्यभरातील क्लास संचालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

अमळनेरमध्येही या मोहिमेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. अमळनेर PTA क्लासेस संघटनेच्या सहकार्याने अंबरिष ऋषी टेकडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

उपस्थित मान्यवर

या कार्यक्रमाला PTA क्लासेस संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर, किरण माळी सर, ॲड. नागराज माळी सर, राकेश बडगुजर सर, सुरश्री वैद्य मॅडम, शेखर कुलकर्णी सर, ज्ञानेश्वर मराठे सर, सुधीर टाकणे सर, हर्षल बडगुजर सर, संदीप महाजन सर, स्वर्णदिप राजपूत सर तसेच अंबरिष ऋषी टेकडी ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. नरेश कांबळे व श्री. सूरज अभंगे उपस्थित होते.

याशिवाय सामाजिक वनीकरण विभाग अमळनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती सुनिता धनगर, वनपाल श्रीमती वैशाली साळी, वनरक्षक श्रीमती सीमा शिंदे व श्री. दिनेश देवरे, रोपवाटिका वनमजूर श्री. दिनेश सैंदाणे, सहकारी श्री. प्रमोद पाटील व श्री. भटू पाटील यांचेही विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा हेतू ठेवण्यात आला. सर्व उपस्थितांनी मिळून वृक्षारोपण केले व पर्यावरण रक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची शपथ घेतली.

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर म्हणाले –
“शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर शिक्षणाबरोबर पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही शिक्षक आणि समाजाने स्वीकारली पाहिजे.”

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होईल, तसेच अशाच प्रकारचे उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्याचे आश्वासन PTA संघटनेने दिले.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 110800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 101900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 84200/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1290/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!