शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते आणि शिरीष दादा मित्र परिवाराचे प्रवक्ते मोहम्मद आरिफ भाया तेली यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार आणि माजी मंत्री आमदार अनिलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा निर्णय घेतला.
या प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार मा.ना. सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. याप्रसंगी आमदार अनिलदादा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, तसेच पक्षाचे इतर प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहम्मद आरिफ भाया हे अमळनेर शहर काँग्रेस (आय) चे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि माजी आरोग्य सभापती मा. मो. शफी भाया यांचे पुत्र असून, समाजसेवेतील त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.