असंविधानिक वक्फ कायद्याच्या विरोधात जलगावमध्ये जनसभा, मौलाना उमरैन रहेमानी करतील मार्गदर्शन..


24 प्राईम न्युज 4 Jul 2025. -जळगाव, ५ जुलै २०२५ | देशभरात वक्फ दुरुस्ती अधिनियम २०२५ विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जलगाव जिल्ह्यात सुद्धा या काळ्या कायद्याविरोधात आवाज बुलंद करण्यात येत आहे. गेले चार महिने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या नेतृत्वाखाली वक्फ कोऑर्डिनेशन कमिटी, जलगाव या कायद्याच्या विरोधात वेगवेगळ्या स्वरूपात सक्रिय भूमिका नोंदविली आहे .
या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात, दिनांक ५ जुलै २०२५, शनिवार रोजी नमाज-ए-मग़रिबनंतर संध्याकाळी ७:३० ते रात्री ९:३० या वेळेत ईदगाह मैदान, जलगाव येथे एक भव्य जनसभा (इज्तेमाई जलसा) आयोजित करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण सभेत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सचिव हजरत मौलाना उमरैन महफूज रहमानी साहेब यांच्यात अध्यक्षतेत होणार आहे.
या सभेचे उद्दिष्ट वक्फ मालमत्तेचे संरक्षण, मुस्लिम समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सरकारने संमत केलेल्या या असंविधानिक कायद्याविरोधात लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करणे हे आहे.