राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागात जळगाव जिल्ह्याच्या पातळीवर नवी दमदार टीम. – ज्ञानदीप सांगोरे व करण साळुंखे यांची नियुक्ती..

आबिद शेख/अमळनेर

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा कार्यक्षेत्रासाठी नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली असून, ज्ञानदीप सांगोरे यांची जिल्हा कार्याध्यक्ष, तर करण साळुंखे यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही निवड गुरुवार, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विविध सेलचे प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या जळगाव जिल्हा दौऱ्यात अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली.
या वेळी राज्याचे माजी मंत्री अनिल पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड यांचीही उपस्थिती होती.
नियुक्तीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
“पक्षाच्या विचारधारेचा आणि धोरणांचा प्रचार-प्रसार सोशल मीडियाच्या प्रभावी माध्यमातून करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोशल मीडिया विभाग निर्णायक भूमिका बजावेल.”
या निवडीमुळे जिल्ह्यातील सोशल मीडिया यंत्रणा अधिक सक्रिय व बळकट होऊन, पक्ष संघटनेला मजबुती मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी दिला. रवि ज्वेलर्स अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1090/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट