वारीसाठी समर्पित सेवा! उधना–पंढरपूर स्पेशल रेल्वेचे जळगाव लोकसभेत जल्लोषात स्वागत – खासदार स्मिता वाघ यांच्या पुढाकाराला यश.

0

आबिद शेख/अमळनेर
पंढरपूर आषाढी वारीसाठी खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश लाभले असून, दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या उधना –पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे भव्य स्वागत जळगाव लोकसभा क्षेत्रातील अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा व चाळीसगाव या स्थानकांवर वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून पार पडले. खासदार स्मिता वाघ यांनी अमळनेरपासून या रेल्वेमध्ये स्वतः प्रवास करून प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून स्वहस्ते हिरवा झेंडा दाखवत रेल्वेला शुभेच्छा दिल्या. पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ-मृदंगाच्या तालावर “जय हरी विठ्ठल” च्या घोषात हजारो वारकऱ्यांनी भक्तिपूर्ण वातावरणात रेल्वेचे स्वागत केले. अनेक ठिकाणी भजनी मंडळांच्या सादरीकरणाने रेल्वे स्थानके भक्तिमय बनली होती.

खासदार स्मिता वाघ यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेली ही सेवा वारीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, सर्वत्र समाधान व कृतज्ञतेचे वातावरण दिसून आले. ही विशेष सेवा केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. वयोवृद्ध, महिला, लहान मुले आणि युवकांसाठीही हा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व आरामदायक ठरतो आहे.

जळगाव लोकसभा क्षेत्रातील पाचही प्रमुख स्थानकांबरोबरच दक्षिण गुजरात मधील सुरत,उधना,व्यारा व पश्चिम खान्देश नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा येथील हजारो भाविकांसाठी ही सेवा एक वरदान ठरली आहे. या प्रवासादरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. विशेष रेल्वेमुळे वारीचा प्रवास अधिक शिस्तबद्ध, भक्तिपूर्ण व आनंददायी होईल, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला.
“वारीचा मार्ग सोपा करणाऱ्या या उपक्रमाचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि खासदार स्मिता वाघ यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” अशा भावना अनेक वारकऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 97600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74100/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!