कमी वेळ, कमी खर्च – २०२६ पासून ‘मिनी हज यात्रा’ देणार हजची परिपूर्ण अनुभूती!

24 प्राईम न्यूज 7 Jul 2025

हजची इच्छा आता पूर्ण करणे अधिक सोपे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एक नविन योजना आणली असून, ‘मिनी हज यात्रा’ म्हणजेच छोट्या कालावधीची हज यात्रा लवकरच सुरू होणार आहे. २०२६ सालच्या हजपासून ही योजना अंमलात येणार असून, विशेषतः वयोवृद्ध, आजारी किंवा वेळेअभावी संपूर्ण हज यात्रा करू न शकणाऱ्या भाविकांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे.

वरिष्ठ नागरिकांना विशेष सवलती
ही योजना मुख्यत्वे ६५ वर्षांवरील वृद्ध भाविकांसाठी आखण्यात आली असून, त्यांच्या सोयीसाठी एक सहायक प्रवासी त्यांच्या सोबत जाण्याची परवानगीही देण्यात येणार आहे.
संपूर्ण हजचा सारांश फक्त १० ते १५ दिवसांत
सामान्यतः हज यात्रेसाठी ४० ते ४२ दिवसांचा कालावधी लागतो, परंतु मिनी हज यात्रा ही फक्त १० ते १५ दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.
या यात्रेत हजमधील सर्व महत्त्वाचे धार्मिक विधी जसे की अराफातमधील मुक्काम,शैतानाला कंकरी फेकणे (रमी),कुर्बानी, तवाफ-ए-वदा (विदाईचा तवाफ)
हे सर्व विधी पूर्ण केले जातील.
मक्का आणि मदिनामध्ये मुक्कामाची कालमर्यादा निश्चित केली जाणार असून, त्यामुळे शारीरिक थकवा कमी, वेळेची बचत आणि खर्चही कमी होणार आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुस्लिम भाविकांनाही हजची अनुभूती घेता येईल.
डिजिटल पोर्टलवरून सोपी नोंदणी
हज २०२६ पूर्वी भारत सरकारचा हज पोर्टल पूर्णपणे डिजिटल होणार असून, भाविकांना मुख्य हज आणि मिनी हज यापैकी पर्याय निवडता येणार आहे. अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि माहिती मिळवणे हे सर्व काही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे शक्य होईल.
पंतप्रधानांचा ‘सर्वांसाठी हज’चा संकल्प
उत्तर प्रदेश राज्य हज समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री दानिश आजाद अन्सारी यांनी माहिती दिली की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे की हज ही यात्रा प्रत्येक इच्छुक भारतीय मुस्लीमांसाठी सुलभ, सुरक्षित आणि सुसज्ज असावी. अल्पसंख्यांक कार्यमंत्री किरण रिजिजू यांच्या माध्यमातून ही योजना प्रत्यक्षात येत आहे.”
टीप: हजसंबंधीच्या या नव्या योजनेची अधिकृत अधिसूचना आणि प्रक्रिया २०२६ पासून अंमलात येण्याची शक्यता आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट