अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई : १५ किलो गांजासह पाचोऱ्याचे दोघे जेरबंद..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत जळोद गावाजवळ छापा टाकून तब्बल १५ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पाचोरा येथील महेश कैलास पाटील आणि नितीन शरद गौंड या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रवींद्र पिंगळे, सुनील लोखंडे, संतोष नागरे, अमोल पाटील, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे व प्रशांत पाटील यांनी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट