धुळेच्या राजकारणात नवे पर्व : फारुक शहा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये.

आबिद शेख/अमळनेर
धुळे शहराच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे. एमआयएमचे माजी आमदार आणि शहरातील लोकप्रिय मुस्लिम नेते फारुक शहा यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे धुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फारुक शहा हे धुळे शहरातील प्रभावशाली नेते मानले जातात. एमआयएमच्या माध्यमातून त्यांनी अल्पावधीतच मुस्लिम समाजात आपली मजबूत पकड निर्माण केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचा प्रभाव अधिक व्यापक होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. फारुक शहा यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “धुळे शहराच्या विकासासाठी आणि सर्व समाजघटकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा योग्य पर्याय आहे. माझे पुढील राजकीय आयुष्य विकासाभिमुख राहील.”
.
धुळेच्या आगामी निवडणुकांवर फारुक शहा यांच्या प्रवेशाचा थेट परिणाम होण्याची शक्यता असून, स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर
24 Ct सोने 99.50% : ₹. 98300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट