समोसा-जिलेबीबाबत ‘धोकादायक’ इशारा नाही – केंद्र सरकारचा खुलासा..

24 प्राईम न्यूज 16 Jul 2025

नवी दिल्ली : देशात लठ्ठपणा वाढत असल्यामुळे समोसा आणि जिलेबीसारख्या तळकट पदार्थांवर ‘धोकादायक’ असा इशारा देण्यात येणार असल्याच्या बातम्या मंगळवारी प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र अशा प्रकारचा कोणताही इशारा देण्यात आलेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने हे वृत्त खोटे ठरवले. त्यानंतर आरोग्य खात्यानेही सांगितले की, समोसा किंवा जिलेबीवर कोणतेही ‘धोकादायक’ लेबल लावले जाणार नाही. ही माहिती अफवेवर आधारित असल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले.
आरोग्य विभागाने केवळ लोकांना आरोग्यदायी आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. “समोसा-जिलेबी खायची असल्यास तुमच्या प्रकृतीनुसार खा; मात्र दैनंदिन आहारात पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा,” असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.