सौ. अंजली सचिन जंगम यांना “भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.

24 प्राईम न्यूज
ए.डी. फाऊंडेशन तर्फे पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात एक उमंग फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अंजली सचिन जंगम यांना “भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

महिलांसाठी आणि मुलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून समाजसेवेत मोलाचे योगदान देत असलेल्या अंजली जंगम मॅडम यांना “आदर्श व्यक्तिमत्व” व “आदर्श समाजसेविका” म्हणून हा सन्मान देण्यात आला.
सौ. जंगम यांनी स्थापन केलेल्या एक उमंग फाउंडेशन या संस्थेद्वारे त्या मागील अनेक वर्षांपासून समाजकार्य क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहेत. सामाजिक जाणिवा वाढवणे, महिलांचे सक्षमीकरण, बालकल्याण, गरजूंसाठी मदत या उद्देशाने त्यांच्या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. “समाजासाठी निःस्वार्थीपणे काम करणे आणि प्रत्येक गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे” हेच त्यांचे ध्येय असल्याचे त्या नेहमी सांगतात.
समाजसेवेतील त्यांच्या या कार्याचा गौरव करताना मान्यवरांनी त्यांची “समाजातील दीपस्तंभ” म्हणून प्रशंसा केली. समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी सौ. जंगम यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी अधोरेखित केले.
त्यांच्या कार्यातील धडाडी, चिकाटी व निःस्वार्थ वृत्तीमुळेच ए.डी. फाऊंडेशनने त्यांना राष्ट्रीय पातळीवरील या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले असून, समाजकार्यातील त्यांच्या योगदानाला सर्वच स्तरातून दाद मिळत आहे.