ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न.

0

24 प्राईम न्यूज 27 Jul 2025

ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात ग.दि. माडगुळकर नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला. या भव्य सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक, कृषी, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज म्हणाले, “आई-वडिलांच्या पायाशी नतमस्तक झालेल्या प्रत्येक मुला-मुलींच्या पायाशी यश लोटांगण घालते. समाजाप्रती व आईवडिलांप्रती नेहमी कृतज्ञ रहा.” वैशाली मार्तंड चव्हाण यांनी सांगितले, “परिस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती बदला. जिद्दीने मिळवलेले यश कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.” तर अनिल जाहीर म्हणाले, “चांगल्या कामाचा परतावा मिळतोच. प्रेम व आदर दुप्पटीने परत येतो. प्रत्येक कुटुंबात स्त्रीचा आदर करा.”

या सोहळ्यात श्री. राम मांडुरके, सौ. ममता भोई दौंडे, प्रियांका शिंदे यांनीही आपले विचार मांडले. तसेच प्राजक्ता मालुंजकर (रिल स्टार / फेम – मोह मोह के धागे), ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज (संत बागडेबाबा आश्रम), सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती.

सोहळ्याचे स्वागत ए.डी. फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. अशोक गोरड, कार्याध्यक्ष महादेव महानूर, स्वागताध्यक्ष अजित चौगुले (संपादक – जनदरबार न्यूज) यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. घनश्याम चौगुले यांनी केले.

या सोहळ्यात दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना “भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील निवडक मान्यवरांना मानपत्र, ट्रॉफी, पदक व शाल देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!