पिंपळे खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्यांची शासकीय कार्यालयांना भेट – कौतुकास्पद उपक्रम.


अमळनेर/आबिद शेख
अमळनेर तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंपळे खुर्द येथील बालिका स्नेही ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी बुधवारी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची थेट माहिती घेतली. तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या भेटीत सरपंच गायत्री पाटील, उपसरपंच साक्षी पाटील, सदस्य वर्षा पाटील, ग्रामसेवक के. के. लंकेश, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील व पुरुषोत्तम चौधरी आदींनी सहभाग घेतला.
पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, विस्तार अधिकारी कटार्यां अण्णा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय रनाडकर व प्रशांत फुगे यांनी डांग्या खोकला, थुंकी तपासणी, रक्त तपासणी, एक्स-रे, गर्भवती महिलांची काळजी या विषयांवर मार्गदर्शन केले. पंचायत समितीच्या प्रत्येक विभागाला महिलांनी व विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
तहसील कार्यालयात नायब तहसीलदार कुलकर्णी यांनी विविध शासकीय विभागांच्या कामकाजाची माहिती दिली. पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकुंभ व पोलीस रवींद्र पिंगळे यांनी महाविद्यालयीन मुलींच्या एसटी प्रवासातील त्रास याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी सहकार्य केले.
ग्रामीण भागातील महिला व विद्यार्थिनींना प्रथमच शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन थेट कामकाजाची माहिती घेण्याची संधी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट