आज लाडशाखीय वाणी समाजात वैवाहिक समस्यांवरील भव्य चर्चासत्र..


अमळनेर /आबिद शेख
लाडशाखीय वाणी समाज पंच मंडळ, अमळनेर आणि लाडशाखीय वाणी समाज विवाह संस्कृती परिवार, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने “शोध वैवाहिक समस्यांचा” या विषयावर भव्य चर्चासत्र आज आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम आज, रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते दु. १ वाजेपर्यंत लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय, पवन चौक, अमळनेर येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. नितीन रंगनाथ देव (देवाची आळंदी, पुणे सुप्रसिद्ध बिल्डर्स) उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. सौ. भाग्यश्री प्रशांत शिनकर (मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, वेदांत बाल रुग्णालय, चाळीसगाव) आणि मा. सौ. अनिता अनिल कासोदेकर (फर्स्ट लेडी ऑफ रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड) वैवाहिक समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. महेश पुंडलिक कोठावदे (अधिक्षक, जिल्हा सत्र न्यायालय, जळगांव), मा. अॅड. श्री. प्रविण पंढरीनाथ अमृतकार (सरचिटणीस, उन्नती एज्यु. सोसा., नाशिक) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या संकल्पक सौ. रेखा नरेंद्र कोतकर (संस्थापक, विवाह संस्कृती परिवार, नाशिक) असून सुयोग महिला मंडळ, वाणी समाज महिला मंडळ आणि नवचैतन्य मित्र मंडळ, अमळनेर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
समस्त समाज बांधवांनी सहपरिवार कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट