अमळनेरात श्री वरणेश्वर महादेव मंदिर संस्थांनच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन. . हजारो शिवभक्तांच्या सहभागाने श्रावणातील धार्मिक उत्साह ओसंडून वाहिला..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेरातील सुप्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री वरणेश्वर महादेव मंदिर संस्थांनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य कावड यात्रा प्रचंड शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. अंदाजे १३-१४ वर्षांपूर्वी मंदिर संस्थांचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या यात्रेला आज मोठे धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

अमळनेर शहर, शिवाजीनगर, तांबापुर, साने नगर, सुंदरपट्टी, रडावन, राजोरे, नदगाव, तासखेडा आदी भागांतील हजारो शिवभक्त श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी यात्रेत सहभागी झाले होते. जळोद, बुधगाव येथील तापी नदी पात्रात रीतसर पूजा करून जल भरल्यानंतर कावड यात्रेची सुरुवात झाली. महिलांचा सहभाग लक्षणीय होता, तर अनेक शिवभक्त अनवाणी पायी चालत अमळनेरात पोहोचले. कावड जलाने केलेला अभिषेक हे मोठे पुण्य लाभदायक मानले जाते.
शिवभक्तांचे उत्साहाने स्वागत. यात्रेच्या मार्गावर सर्वत्र शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले श्री नितीन भदाणे यांनी रांगोळ्या साकारून मार्ग सजवला शिवदास सुभेदार यांनी जेसीबीवरून फुलांचा वर्षाव करत स्वागत केले व स्वादिष्ट पोह्यांचा नाश्ता दिला बुधगावचे ऊर्वेस साळुंखे व दिनेश वाघ, बहादरपूरचे प्रा. प्रीतम वाघ, संतोष वाघ, हिम्मतराव पाटील, कुंदन वाघ यांनी शुभेच्छा दिल्यात.
खा.शि. मंडळ, अर्बन बँक, शिवसेना, भाजप, काँग्रेस आदींचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवभक्तांना पाणी व नाश्त्याची व्यवस्था करून शुभेच्छा दिल्या अंमळगाव येथे श्रीराम धर्मा चौधरी व कुटुंबियांनी सुग्रास प्रसादाची व्यवस्था केली.
गांधीली येथे पिंटू चहावाला, रोहिदास पाटील, वालचंद बाविस्कर आदींनी चहापाणी दिले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट