श्री शुभम कोकीळ यांना ए.डी. फौंडेशनचा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श युवा उद्योजक. पुरस्कार.                                  उद्योजकतेत यशाची घोडदौड करत समाज परिवर्तनाचा वसा घेणाऱ्या तरुणाचा गौरव.

0

24 प्राईम न्यूज 27 Jul 2025

परिते – परिते येथील तरुण आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या श्री शुभम कोकीळ यांना ए.डी. फौंडेशन तर्फे “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श युवा उद्योजक पुरस्कार 2025” जाहीर झाला आहे. कमी वयात स्वतंत्र व्यवसाय साम्राज्य उभारून समाजोपयोगी उपक्रमांतून ठसा उमटवणाऱ्या कोकीळ यांची ही निवड अत्यंत गौरवास्पद मानली जात आहे.

२०१८ मध्ये त्यांनी हर्षदा ग्रीन प्लॅनेट अंतर्गत हर्षदा अग्रोटेक कंपनीची यशस्वी स्थापना केली. त्यानंतर २०१९ मध्ये विद्यार्थ्यांसाठी शिस्तप्रिय विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत अनेकांना दिशा दिली. २०२२ मध्ये राज्य परिवहन (एसटी) सेवेच्या आधुनिकीकरणासाठी जीपीएस प्रणालीचा अभिनव प्रकल्प सादर करून प्रवाशांच्या प्रतीक्षेची समस्या सोडवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. या प्रणालीमुळे एसटीची अचूक लोकेशन आणि स्थानकात आगमनाची वेळ प्रवाशांना कळणे शक्य झाले.

२०२४ मध्ये त्यांनी Harshada Chemicals Industries ची स्थापना करून फिनाइल, हँडवॉशसह १२ उत्पादने बाजारात आणली. पुणे, मराठवाडा आणि विदर्भामध्ये या प्रॉडक्ट्सना मोठी मागणी मिळत आहे.

शुभम कोकीळ यांचे ध्येय केवळ स्वतःची प्रगती न करता इतरांना साथ देत व्यवसायाच्या नव्या वाटा निर्माण करणे हे आहे. ते सातत्याने नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देत आहेत.

यापूर्वी त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना रेड क्रॉस सोसायटी युवा वक्तृत्व पुरस्कार, रयत युथ पुरस्कार, आणि भारतीय जैन संघटना युवा वक्तृत्व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एक लोकप्रिय व्याख्यानकार म्हणून ते आजच्या तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!