दूषित पाण्याच्या समस्येविरोधात गांधलीपुरा दर्गा अली मोहल्ल्यात निवेदन; ८ व १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा..

0

आबिद शेख/अमळनेर अमळनेर दूषित पाण्याच्या समसे विरोधात निवेदनात म्हटले आहे की, नळांमधून येणारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण करत असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांची प्रकृती धोक्यात आली आहे. यापूर्वी ६ डिसेंबर २०२४ रोजीही निवेदन देण्यात आले होते; मात्र नगरपरिषदेने कोणतीही दखल घेतली नसल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे.

३ इंची पाईपलाइनऐवजी ४ इंची नवीन पाइपलाइनची मागणी
सदर भागात वस्ती वाढलेली असून, सध्या असलेली ३ इंची जुनी व गळतीची पाईपलाइन अपुरी ठरत आहे. त्यामुळे तात्काळ ही पाइपलाइन बदलून ४ इंची नवीन पाइपलाइन बसविण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

८ व १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा
निवेदनात असा इशारा देण्यात आला आहे की, जर तातडीने कारवाई झाली नाही, तर ८ ऑगस्ट रोजी ‘क्रांती दिना’च्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात येईल. तसेच १५ ऑगस्ट २०२५ रोजी नगरपरिषदेसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

निवेदन देतांना मौलाना रियाज़ शेख यांच्यासह अमजद भाई, लतीफ पठान, मनोज मोरे, अल्तमश शेख, बापू चौधरी, इमरान भाया, किरण पाटील, कमरोद्दीन शेख, बाबा शेख, ताहेर शेख, जहुर मुतवल्ली, निहाल पठान, धनराज पारधी, तसेच परिसरातील महिला नागरिक शमीरा बी, मुमताज शेख, रेहाना बी, मलेका शेख, सुल्तान मलीक, सरो बाई भीमराव, नंदिनी पांडुरंग, सारिका ढालवाले आदी उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 99100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75300/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!