२४ तासांत पारोळा पोलिसांचा कौतुकास्पद पराक्रम! घरफोडीचा गुन्हा उघड – अमळनेर येथील संशयिताची कबुली..


24 प्राईम न्यूज 25 Jul 2025
पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेला घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांच्या आत उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. पारोळा पोलीस स्टेशन गुरनं. १९९/२०२५, बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये दिनांक २४ जुलै रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोहवा संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे व पो.कों. राहुल कोळी यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान गोपनीय सूत्रांच्या मदतीने संशयित इसम भूषण कैलास चंदनशिव (वय २७, रा. अमळनेर) याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानेच घरफोडी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. श्रीमती कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव भाग) व मा. श्री. विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संशयितास पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट