चेन्नई–जोधपूर एक्सप्रेसला अमळनेरमध्ये थांबा – खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेरवासीयांसाठी आनंदाची बातमी! दीर्घ पल्ल्याची चेन्नई–जोधपूर एक्सप्रेस (गाडी क्र. 22663/22664) आता अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. हा निर्णय विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार व सामान्य प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

या थांब्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमधील प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाला.
गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अमळनेरकरांच्या मागणीवर ठामपणे भाष्य केले. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या थांब्याला अधिकृत मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे अमळनेर व परिसरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. खासदार स्मिता वाघ म्हणाल्या,
“हा केवळ एका गाडीचा थांबा नाही, तर अमळनेरच्या सर्वांगीण विकासाचा मैलाचा दगड आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखीही प्रयत्न सुरूच राहतील.”
या उपक्रमाबद्दल अमळनेरकरांनी खासदार स्मिता वाघ यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट