पिंपळी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी व लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त वकृत्व व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न..

आबिद शेख/अमळनेर

महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, पिंपळी येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी व लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय आप्पासो रघुनाथ गेंदा महाजन सार्वजनिक वाचनालय, पिंपळी यांच्या वतीने वकृत्व व चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंडळ अध्यक्ष व ग्रामपंचायत सरपंच दादासो श्री प्रेमराज वामन चव्हाण होते. संस्थेचे चेअरमन नानासो श्री जनार्दन मांगो शेलकर, व्हाईस चेअरमन डॉ. श्री जीवनलाल भिवसन जाधव, संचालक आबासो श्री सुधाकर रघुनाथ महाजन तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास प्रभाकर शेलकर यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
इयत्ता 5वी ते 10वीतील 35 विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. मराठी व इंग्रजी भाषेत सावता महाराजांचे कार्य, जीवनचरित्र तसेच लोकमान्य टिळकांचे कार्य अभ्यासपूर्ण व प्रभावी शब्दांत मांडून विद्यार्थ्यांनी मान्यवरांची मने जिंकली.
मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत
व्हाईस चेअरमन डॉ. जीवनलाल भिवसन जाधव यांनी आपल्या मनोगतातून “आपले काम हीच देवपूजा आहे” हा सावता महाराजांचा जीवनसंदेश विद्यार्थ्यांना समजावून सांगितला व प्रत्येकाचे ध्येय निश्चित असले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
मुख्याध्यापक श्री विकास शेलकर यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीचे व सहभागाचे कौतुक करून “कार्यक्षेत्र हेच तीर्थक्षेत्र आहे” तसेच “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तींचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगितला.
अध्यक्ष दादासो प्रेमराज वामनराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून “**हीच आमुची प्रार्थना, आणि हेच आमचे मागणे… माणसाने माणसाशी माणसा सम वागणे
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट