बनावट कॉल सेंटर प्रकरणी जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह ८ जणांना अटक..

24 प्राईम न्यूज 29 Sep 2025

जळगाव : बनावट कॉल सेंटर चालवून परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे.
मुराबाद रोडवरील ललित कोल्हे यांच्या के.एल. फार्म हाऊसमध्ये हे कॉल सेंटर सुरु करण्यात आले होते. रविवारी पोलिसांनी येथे छापा टाकून तब्बल ३२ लॅपटॉप आणि ७ मोबाईल जप्त केले. या ठिकाणी परराज्यातील अनेक तरुण काम करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या कॉल सेंटरच्या माध्यमातून देश-विदेशातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याचा पोलिसांना संशय होता. छापेमारीदरम्यान या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यात आला.
ललित कोल्हे हे सध्या शिवसेना शिंदे गटात असून सप्टेंबर २०१७ मध्ये ते जळगावचे महापौर म्हणून निवडून आले होते.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 117800
22 Ct सोने 91.60% : ₹. 107400
18 Ct सोने 75.00% : ₹. 89500
शुद्ध चांदी 999%:₹. 1470/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट