‘लाडक्या बहिणी’ चिंताग्रस्त – ई-केवायसी करताना अडचणी, योजनेतून बाद होण्याची भीती..

0


24 प्राईम न्यूज 29 Sep 2025

मुख्यमंत्री ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला थेट बँक खात्यात १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेतून आतापर्यंत तब्बल २ कोटी ४० लाख महिलांना लाभ मिळाला आहे. मात्र आता महिला व बालविकास विभागाने दोन महिन्यांत ई-केवायसी करणे बंधनकारक केले असून त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांच्या चिंतेत भर पडली आहे.

ई-केवायसी करताना पोर्टल सुरू न होणे, ओटीपी न मिळणे अशा तांत्रिक अडचणींमुळे अर्जदार महिला मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. त्यामुळे २० नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास योजनेतून बाद होण्याची भीती त्यांना सतावत आहे.

‘लाडकी बहिण’ ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होऊन पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा होऊ लागले. मात्र, पात्र महिलांची संख्या आणखी कमी करण्यासाठीच ही ई-केवायसी अट घालण्यात आल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

सध्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया सुरू असली तरी तांत्रिक त्रुटींमुळे अनेक महिलांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. योजनेतून वंचित राहण्याची भीती असल्याने लाभार्थी महिलांची चिंता अधिकच वाढली आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 117800

22 Ct सोने 91.60% : ₹. 107400

18 Ct सोने 75.00% : ₹. 89500

शुद्ध चांदी 999%:₹. 1470/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!