” विसरून साऱ्या चिंता आनंद घेऊ जगण्याचा, सोहळा सजला आज मैत्रिणींचा कराया जागर स्त्री शक्तीचा “!

आबिद शेख/अमळनेर


” साने गुरुजी बालवाडी” विभागात नवरात्री महोत्सव निमित्ताने महिलापालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी भरपूर महिला सहभागी झाल्या.मनसोक्त खेळ खेळून आकर्षित बक्षीस मिळवली, पाकस्पर्धा लहान मुलांचे आहारावर आधारित असल्याने महिलांनी विविध पौष्टिक डिश बनवून आणल्या. आणि काही वन मिनिट शो झाले त्यात महिलांनी अतिशय जोमाने खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच, सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष आबासो. हेमकांत पाटील सर, दादासो. संदीप घोरपडे सर , व सर्व कार्यकारी मंडळ, व बालवाडीच्या मुख्या. वैशाली महाजन मॅडम यांनी दीपप्रज्वलन केले. पाककलेचे परीक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि नंतर नवदुर्गा यांच्या वेषभूशेत आलेल्या आमच्या छोट्या विद्यार्थिनी व त्यांच्या आई यांना समोर बोलवून घोरपडे सरांनी त्यांचे कौतुक केले. सरांनी नवरात्रीचे नऊ दिवसाचे महत्व ,देवीचे नावे व रुपाचे महत्त्व सांगितले. स्त्रियांचा आदर कसा करावा याची माहिती दिली नंतर पाककलेचे डिशेस बद्दल पौष्टिक आहारावर चर्चा केली नंतर महिलांनी गेम खेळत असताना मान्यवरांनी सुद्धा गेम खेळण्याचा आनंद घेतला. अशाप्रकारे सर्व स्पर्धा रंगतदार झाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सोनार मॅडम यांनी केले. सर्व खुश होऊन बक्षीसे मिळवून आनंदाने घरी गेले..