खंडणी प्रकरणी 24 तासाच्या आत आरोपींना जेरबंद केले कौतुकास्पद बाब आहे- आ. चिमणराव पाटील यांचे प्रतिपादन…

एरंडोल(प्रतिनिधी) बालाजी उद्योग समूहाचे संचालक तथा ख्यातनाम उद्योजक अनिल काबरा यांना खंडणी बहाद्दरांकडून त गेल्या काही दिवसापासून त्रास दिला जात होता त्यांनी एरंडोल स्टेशनला तक्रार केल्यावरून अवघ्या २४ तासाच्या आत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना गजाआड केले ही त्यांची तत्पर कारवाई त्यांच्या अभिनंदनास पात्र ठरते. पोलिसांच्या या स्तुत्य कामगिरीमुळे शहरातील व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळालेला आहे. असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.
बालाजी उद्योग समूहातर्फे
मंगळवारी रात्री उशिरा एरंडोल पो. स्टेशन येथे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अनिल पाटील ममता तडवी, वैशाली पाटील मिलिंद कुमावत संतोष चौधरी राजेश पाटील अकिल मुजावर या पोलीस कर्मचाऱ्यांचा आमदार चिमणराव पाटील शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी एरंडोल शहर व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक चौधरी, जगदीश बिर्ला, वासुदेव पाटील, उद्योजक अनिल काबरा, संजय काबरा, प्रसाद काबरा, संभाजी पाटील, शालिग्राम गायकवाड, नितीन बिर्ला, मयूर बिर्ला, भगवान पाटील, भास्कर ठाकूर, पवन बिर्ला, राकेश लढे, जाखीटे,मानुधने,भाईजी आदी व्यापारी व नागरिक उपस्थित होते.