धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक करवाई करा; मुस्लिम बांधवांचे आंदोलन—

जळगाव. (प्रतिनिधि) इस्लामचे अंतिम प्रेषितांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सुन्नी जामा मश्जिद संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी सैय्यद अयान अली नियाज अली, अहमद खान युनूस खान, फिरोज शेख इकबाल यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.