बोहरा गाव पुनर्वसनासाठी १६ जुलै रोजी प्रांत कचेरी व आमदारांच्या घरावर मोर्चा..


आबिद शेख/अमळनेर
तापी, बोरी आणि अनेर नद्यांच्या संगमावर वसलेल्या बोहरा गावाचे निम्न तापी प्रकल्पात १०० टक्के पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी गावकऱ्यांनी १६ जुलै रोजी प्रांत कचेरी व आमदार अनिल पाटील यांच्या घरावर मोर्चाचे आयोजन केले आहे.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, निम्न तापी प्रकल्पाचे झालेले सर्वेक्षण चुकीचे असून गावावर अन्याय झाला आहे. बोहरा गाव धरणाच्या फक्त एक किलोमीटर अंतरावर असून २००५-०६ साली झालेल्या अतिवृष्टीत संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा बसला होता. त्या वेळी ग्रामस्थ आणि जनावरे सुरक्षित स्थळी हलवावी लागली होती. धरणाचा पाया सुद्धा त्यावेळी बांधलेला नव्हता. धरण पूर्ण झाल्यानंतर गाव संपूर्ण पाण्याखाली जाणार असल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे.
तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी २६ मार्च २०२५ रोजी गाव भेटीत नवीन हाय फ्लड टेस्ट, प्लॉट टेस्ट, घरांचे संरचनात्मक ऑडिट व माती परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु तीन महिने उलटूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
योग्य ती कार्यवाही न झाल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थ तापी, बोरी, अनेर नद्यांच्या संगमावर जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या मोर्चाचे आयोजन निखिल धनगर, दगडू पाटील, जयेश बागुल आणि बन्सीलाल भिल यांनी केले आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट