हनी ट्रॅप प्रकरणावरून खडसे-महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची मालिका तीव्र..

आबिद शेख /अमळनेर

: हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात तापलेल्या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र रंगले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना खडसे यांनी, “प्रफुल्ल लोढासोबत हनी ट्रॅप प्रकरणात गिरीश महाजन यांचा देखील सहभाग असू शकतो,” असा संशय व्यक्त केला. “मुख्यमंत्री यांच्यावर मला राग नाही, मात्र नाशिकमधील हनी ट्रॅपशी संबंधित व्यक्ती आणि हॉटेल त्यांना माहिती आहे, म्हणून तातडीने एसआयटी नेमून कसून चौकशी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.
यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, “एसआयटी चौकशी व्हायलाच हवी, पण त्यांच्या (खडसे) मुलाच्या बाबतीतही प्रफुल्ल लोढाने अशीच मागणी केली होती. उजव्या हाताचा माणूस डाव्या बाजूने डोक्यात गोळी कशी घालेल, याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. त्या प्रकरणाची चौकशी जशी होईल, तशीच या प्रकरणाचीही होईल.”
तसेच त्यांनी खडसे यांच्यावर थेट टीका करताना, “तुम्ही विनाकारण मला टार्गेट करत असाल, बदनाम करण्याचा प्रयत्न करत असाल, तर मग आमची तयारी आहे,” असेही स्पष्ट केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट