प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर जाण्यासाठी प्रवाशांची कसरत; एस्केलेटरची प्रवाशांकडून मागणी..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : अमळनेर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर जाण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी भला मोठा रॅम्प तयार केला असला, तरी त्याचा वापर करणारे प्रवाशी मात्र फारसे दिसत नाहीत. रॅम्पची उंची खूपच जास्त असल्याने प्रवासी त्याचा वापर टाळतात.

पर्याय म्हणून प्रवासी जीव मुठीत घेऊन थेट रेल्वे रूड क्रॉस करतात. लहान मुलांना हाताला धरून, काही जण आजारी व वयोवृद्धांना घेऊन रूड क्रॉस करताना दिसतात, ज्यामुळे अपघाताचा धोका कायम असतो.
“रॅम्प ऐवजी जर रेल्वे प्रशासनाने एस्केलेटर लावले असते, तर महिला, वयोवृद्ध, आजारी व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना मोठी सोय झाली असती,” अशी भावना प्रवाश्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमळनेर रेल्वे स्थानकावर एस्केलेटरची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट