मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरमध्ये महा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

0

आबिद शेख/अमळनेर
राज्याचे यशस्वी नेतृत्व करणारे आणि लोकनेते म्हणून ओळखले जाणारे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे अमळनेरमध्ये “महा रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले. हा उपक्रम जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा भैरवी वाघ, माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी व प्रदेश पदाधिकारी हरचंद लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर शहर मंडल, जानवे मंडल व पातोंडे मंडल येथे एकाचवेळी रक्तदान शिबिरे पार पडली.

या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे युवक आणि पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत समाजाप्रती आपली संवेदनशीलता अधोरेखित केली.

या यशस्वी आयोजनासाठी भाजप शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, सरचिटणीस भरतसिंह परदेशी, देविदास लांडगे, पांडुरंग महाजन (माजी नगरसेवक), विजय राजपूत, उमेश वाले, भारती सोनवणे, राकेश पाटील, उपाध्यक्ष श्याम पाटील, कैलास भावसार, प्रीतपालसिंग बग्गा, रमेश धनगर, दिलीप ठाकूर, रामभैय्या कलोसे, शिवा महाजन, विष्णू सैनानी, पिंटू चौधरी, दीपक भोई, बापू पाटील, श्याम भावसार, अनिल लाड, रवी ठाकूर, सचिन साळुंखे, संभाजी पाटील, महेश पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस राहुल चौधरी, समाधान पाटील, स्वप्निल चौधरी, भूषण सूर्यवंशी, निलेश पाटील, कल्पेश पाटील, भूषण महाजन, अक्षय चव्हाण, उज्वल मोरे, शुभम मोरे व इतर पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शिस्तबद्ध नियोजन, सामाजिक अंतर व आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामाजिक कार्याला व नेतृत्वाला अभिवादन करत, अमळनेर भाजपच्या माध्यमातून या उपक्रमातून एक सकारात्मक सामाजिक संदेश देण्यात आला.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!