आनंद आदलिंगे सरांचा गौरव : ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार २०२५’ ने सन्मानित.

0

24 प्राईम न्यूज 28 Jul 2025

सोलापूर │ अनगर
सोलापूर जिल्ह्यातील अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, अनगर येथे गणित विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री. आनंद सुरेश आदलिंगे सर यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव / समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा २०२५’ या भव्य सोहळ्यात दिनांक २६ जुलै २०२५ रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून –
✅ तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती, संत बागडे बाबा आश्रम)
✅ वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त, मनपा पुणे)
✅ श्रीराम मांडुरके (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे)
✅ श्रीमती प्राजक्ता मालुंजकर (रिल स्टार)
✅ कु. श्वेता परदेशी (इंटरनॅशनल मॉडेल)
✅ ममता भोई (मिस इंडिया)
तसेच ए. डी. फाऊंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरड यांची विशेष उपस्थिती होती.

आदलिंगे सरांचे योगदान

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण, प्रभावी आणि प्रेरणादायी कार्य करीत असलेल्या आदलिंगे सरांचा हा पुरस्कार त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा गौरव आहे. लहान वयातच या महिन्यात त्यांनी दोन प्रतिष्ठित पुरस्कारांची कमाई केली असून, त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी आदर्शवत ठरणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!