संसद रत्न पुरस्कार २०२५ – खासदार स्मिता वाघ यांचा गौरव, जळगाव जिल्ह्याचं नाव उज्वल!



आबिद शेख/अमळनेर
“संसद रत्न पुरस्कार २०२५” अंतर्गत लोकसभेतील सर्वोत्कृष्ट संसदीय कामगिरी करणाऱ्या खासदारांमध्ये मा. श्रीमती स्मिता वाघ यांची निवड झाली असून, त्यांना संसद भवन, नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशस्वी निवडीबद्दल जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

खासदार म्हणून आपल्या कार्यकाळात प्रश्न विचारणे, मुद्द्यांवर चर्चा करणे आणि लोकहितासाठी सतत पाठपुरावा करणे या सर्वच बाबतीत त्यांनी संसदेच्या कामकाजात प्रभावी उपस्थिती नोंदवली. हा पुरस्कार त्यांच्या जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व प्रामाणिकपणे करणाऱ्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवरील पावती आहे.
हा सन्मान त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा, कार्यकर्त्यांचा व सहकाऱ्यांचा असून, त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाची उज्ज्वल छाप यातून दिसून येते.
जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने मा. श्रीमती स्मिता वाघ यांना या गौरवाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट