महिन्यापासून फरार असलेला रोड रॉबरीचा आरोपी अखेर जेरबंद – स्थानिक गुन्हे शाखा जळगावची यशस्वी कारवाई.


अमळनेर/आबिद शेख
धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या रोड रॉबरी प्रकरणातील मुख्य आरोपी अभिजीत भरतसिंग राजपूत (वय २७, रा. मळाणे वणी, ता.जि.धुळे) याला अखेर स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकाने अटक केली आहे. तो गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता.

१६ डिसेंबर २०२४ रोजी धरणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ४६०/२०२४ नुसार बीएनएस २०२३ कलम ३०९ (४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील प्रमुख आरोपी व गुन्ह्याचे मास्टरमाइंड अभिजीत राजपूत याने अक्षय उर्फ घोडा पाटील (रा. तामसवाडी, ता. पारोळा), संभाजी पाटील (रा. सातरणे, धुळे) आणि अजय थोरात (रा. नवलनगर, धुळे) यांच्या मदतीने हा गंभीर गुन्हा केला होता.
पोलिसांनी आधी अक्षय पाटील याला ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली होती, मात्र इतर तीन आरोपी फरार होते. गुन्ह्याच्या सखोल तपासादरम्यान श्री. संदीप पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
२६ जुलै २०२५ रोजी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अभिजीत राजपूत आपल्या मूळ गावी मळाणे येथे असल्याचे समजले. पथकाने तात्काळ सापळा रचून त्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात अटक केली. चौकशीत त्याने अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.क्र. ५६३/२०२४ (कलम ३०९(६)) अंतर्गत गुन्ह्यात सहभागाची कबुली दिली.
अभिजीत राजपूत याच्यावर खालील पोलिस स्टेशनमध्ये आधीचे गुन्हेही नोंदवलेले आहेत:
अ.क्र. पोलीस स्टेशन जिल्हा गुन्हा क्रमांक व कलम
१ सोनगीर धुळे गु.र.क्र. १२१/२०२० – भादंवि ३९२, ३४
२ धुळे तालुका धुळे गु.र.क्र. १२१/२०२२ – भादंवि ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, २०१
३ अमळनेर जळगाव गु.र.क्र. ५६३/२०२४ – बीएनएस ३०९(६)
४ धरणगाव जळगाव गु.र.क्र. ४६०/२०२४ – बीएनएस ३०९(४), ३(५)
सदरची कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. कविता नेरकर (अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव), मा. अशोक नखाते (अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. विनायक कोते (उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर), श्री. संदीप पाटील (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक शरद बागल, पो.ह. संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोशि राहुल कोळी, मपोशि दर्शना पाटील, चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.
इतर दोन फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास अमळनेर पोलीस करत आहेत.