नंदुरबारमध्ये इंस्टाग्राम रीलवरून युवकावर गुन्हा; दोन समाजात तणाव निर्माण करण्याचा आरोप..

0

24 प्राईम न्यूज 10 Aug 2025


नंदुरबार – शहरातील माळीवाडा परिसरातील राजेंद्र खंडू माळी या युवकाने इंस्टाग्रामवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर असलेली रील व्हायरल केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपीने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमुळे दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता होती.

त्यामुळे आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 192, 196(1)(A)(B), 353(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सायबर सेलने अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट्सवर काटेकोर नजर ठेवण्यात येत असल्याचे सांगितले असून, दोन समाजात तेढ निर्माण करणारा कोणताही मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!