पिंपळे रोडवरील मरीआई मंदिरात पारंपारिक चक्रपूजा उत्साहात..

आबिद शेख/अमळनेर

– अमळनेर येथील पिंपळे रोड परिसरातील मरीआई मंदिराचा जिर्णोद्धार झाल्यानंतर, वासुदेव जोशी गोंधळी समाजातर्फे पारंपारिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे मरीआईची चक्रपूजा (कढई पूजा) उत्साहात पार पडली.
गावाबाहेर वसलेल्या या ऐतिहासिक मंदिरात श्रावण महिन्यात संपूर्ण वासुदेव जोशी गोंधळी समाज सामूहिक चक्रपूजा करतो. यावर्षी जोशीपुरा येथून वाजत गाजत मिरवणुकीने देवीची पालखी पिंपळे नाल्याजवळील मंदिरात आणण्यात आली. मिरवणुकीत महिलांनी हातात देवीचे ताट, नेवैद्य व पूजा थाळी घेऊन सहभाग नोंदवला. नवविवाहित जोडप्यांनी देवीची विशेष पूजा केली तर सर्वांनी मिळून सामूहिक आरती केली.
या वेळी समाजाचे अध्यक्ष विलास दोरकर, उपाध्यक्ष नारायण शिंदे, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, तसेच समाज पंच मंडळाचे कपिल दोरकर, भगवान शिंदे, रविंद्र शिंदे, महेश जोशी, योगेश शिंदे, देवेंद्र दोरकर, दिपक दोरकर, सुमित दोरकर, हरीश विधाते, नरेंद्र दोरकर, आदित्य दोरकर, येतीश शिंदे, जयेश दोरकर, नयन शिंदे, विनोद दोरकर, रोहित भोपे यांच्यासह महिला कार्यकर्त्या वैशाली दोरकर, विस्तार अधिकारी सौ. शैलजा शिंदे, गोदावरी दोरकर, वंदना शिंदे, कमलबाई शिंदे, नयना अहिरराव, अनिता दोरकर, मनीषा दोरकर, पुष्पा दोरकर, मीना दोरकर, रजनी विधाते, सीमा भोपे, शोभा दोरकर आदी उपस्थित होते.
भाविकांच्या मते, नवसाला पावणारी मरीआई म्हणून या मंदिराला विशेष महत्त्व असून, जिर्णोद्धारानंतर येथे भाविकांची वर्दळ वाढली आहे.