अमळनेरमध्ये डेंग्यू प्रतिबंधासाठी मोहीम वेगाने — ३५ पथकांतर्फे घराघरांत सर्वेक्षण, ९८९ घरांत अळ्यांचा शोध.

0

आबिद शेख/अमळनेर



डेंग्यूचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेकडून मोठ्या प्रमाणावर कीटकशास्त्रीय सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. एकाचवेळी ३५ पथकांच्या माध्यमातून शहरातील सर्व २७ हजार कुटुंबांची तपासणी सुरू असून १३ ऑगस्टपर्यंत ५४,३९४ लोकसंख्या असलेल्या १३,२६५ घरांची तपासणी पूर्ण झाली आहे. यात ९८९ घरांत १,७५२ दूषित कंटेनरमधून डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

यंदा डेंग्यू रुग्णसंख्या संथगतीने वाढत असली तरी डासांचे स्थलांतर इतर भागात होऊन संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे एकाचवेळी सर्वत्र अळ्या नष्ट करणे आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

सर्वेक्षणात आरोग्य सेवक, परिचारिका, आशा स्वयंसेविका यांचा समावेश असलेल्या ३५ पथकांनी घरातील फ्रीजमागील भांडे, छतावरील रिकामी भांडी, पक्ष्यांचे पाणी पिण्याची भांडी, फुटके मटके, टायर, बादल्या, नारळाच्या करवंट्या अशा ठिकाणांची तपासणी केली. विशेषतः फ्रीजमागील भांड्यात पाणी साचल्याने अळ्यांचे प्रमाण जास्त आढळून आले. दूषित कंटेनर त्वरित रिकामे करण्यात आले.

शहरभर दररोज धुरळणी, कीटकनाशक फवारणी, डबक्यांत अॅबेट टाकणे अशी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहे. नगरपरिषदेकडून नागरिकांना घरगुती पाणी साठवण स्वच्छ ठेवण्याचे आणि डेंग्यू प्रतिबंधासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!