ए. पी. जे. अब्दुल कलाम विचार मंचतर्फे नोटबुक, मिठाई व तिरंगा वाटप.

0

प्राईम न्यूज 15 Aug 2025


धरनगाव (भडंगपुरा) – इक़रा वेलफेअर सोसायटी, धरनगाव संचलित नोबल इंग्लिश मीडियम स्कूल, भडंगपुरा येथे ए. पी. जे. अब्दुल कलाम विचार मंचतर्फे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना व शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी नोटबुक, मिठाई व तिरंगा झेंडे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी इक़रा वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नईम अहमद उस्मान गनी मोमिन, सहसचिव रियाज अली काझी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ए. पी. जे. अब्दुल कलाम विचार मंचतर्फे अध्यक्ष करीम खान, उपाध्यक्ष रहमान शाह, सचिव शफी शाह, तसेच मंचाचे सदस्य सज्जाद अली, नगर मोमिन, अबुलैस मोमिन, कालू भाई मोमिन यांच्यासह अन्य सदस्य सहभागी झाले.

सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच मेहनत आणि प्रामाणिकपणे प्रगती करण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!