गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. डांगरी व मारवड येथे ‘विश्वशांती बहुउद्देशीय संस्था’चा उपक्रम.

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील डांगरी व मारवड या ग्रामीण भागांतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘विश्वशांती बहुउद्देशीय संस्था’मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रविण बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेनसह आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी व त्यांची शैक्षणिक गरज भागविण्यासाठी संस्थेने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरले आहे.
कार्यक्रमात आदरणीय भंते संघरक्षित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षण हीच खरी संपत्ती असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने बाळगून शिक्षणात प्रगती साधावी.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व उर्जा निर्माण झाली.
यावेळी गावातील पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छायाबाई पानपाटील, समाधान शिरसाठ, विनोद पाने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आह.