नंदुरबारमध्ये शांतता समितीची बैठक : गणेशोत्सव आणि ईदसाठी बंधुतेचा संदेश..

नंदुरबार/ प्रतिनिधि

नंदुरबार : आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलादुन-नबी या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात पोलीस महानिरीक्षक (आयजी) यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्ह्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, सीरत कमिटीचे सदस्य आणि विविध धर्मीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत सण आनंद, उत्साह आणि बंधुभावाने पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.
“सणांच्या तारखा बदलणे हा उपाय नाही”
या बैठकीत सीरत कमिटीचे सदस्य सय्यद फरहत हुसेन यांनी ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, “सणांच्या तारखा पुढे-मागे करणे हा समस्येवरचा उपाय ठरू शकत नाही. खरी ताकद म्हणजे सर्वांनी आपापले सण स्वातंत्र्याने आणि बंधुभावाने साजरे करणे.”
त्यांनी प्रशासनाला सुचवले की, कोणत्याही उपद्रवी व्यक्तींना धार्मिक स्थळांसमोर चुकीच्या घोषणा देण्याची संधी देऊ नये. समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, पण सणांची वेळ बदलून भीतीचे वातावरण निर्माण होता कामा नये. त्यांनी पोलीस प्रशासनावर विश्वास व्यक्त करत सांगितले की, “पोलिस सक्षम आहेत आणि ते समाजकंटकांशी लढण्यासाठी सज्ज आहेत.”
फरहत हुसेन यांच्या भाषणाला टाळ्यांचा गजर
फरहत हुसेन यांच्या या प्रभावी भाषणानंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. त्यांनी शेवटी एक शेर वाचला, जो उपस्थितांच्या हृदयाला स्पर्शून गेला :
गीता का भी एहतराम हो,
क़ुरान पर ईमान भी हो,
मंदिर में हो भजन-कीर्तन,
मस्जिद में अज़ान भी हो…
मिरवणुकीच्या तयारीची माहिती
बैठकीत हेरा इंग्लिश स्कूलचे चेअरमन सईद नूरी यांनी जुलूस-ए-मोहम्मदीच्या तयारीविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यावेळी जुलूस भव्य आणि दिमाखदार पद्धतीने काढला जाणार आहे. तसेच, प्रत्येक मुस्लिम भागात कमिटीच्या बैठकांचे आयोजन करून मोहल्लानिहाय 11 सदस्यीय समित्या स्थापन केल्या जातील.
पोलीस प्रशासनाचा नागरिकांना संदेश
या महत्त्वपूर्ण बैठकीला आयजींसह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, गणेशोत्सव आणि ईदचे सण शांतता, सलोखा आणि बंधुतेच्या वातावरणात साजरे करावेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट